सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी
अॅड.श्री. संजय देवगुंडे यांच्या दिव्यांगांसाठीच्या "संजीवन आधार" या प्रकल्पातुन संजीवन फाउंडेशन व ग्रामपंचायत रेडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये रेडे गावामधील 13 दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र वाटप करण्यात आली
दिव्यांग हा समाजतील दुर्लक्षित घटक असून त्यांच्या जगण्यात सहजता आणि सुलभता यावी म्हणून त्यांना अश्या गरजेच्या वस्तू देऊन संजीवन फाउंडेशन कडून वेळोवेळी मदत केली जाते.
ज्ञानदेव संभाजी शेंडगे, आप्पा सदाशिव बर्वे, साधू जगू मदने, बापू सोपान बर्वे, सुरेखा बापू शेंडगे, उत्तम संभाजी शेंडगे, पोपट आगतराव काळे, सुनंदा पोपट शेंडगे, धनाजी राजाराम काळे, संभाजी पांडुरंग पारसे, नकुसाबाई सदाशिव कोळेकर, बाई गणपत पांढरमिसे या लाभार्थ्यांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले.
परिसरातील ज्या दिव्यांगांना कानाची मशीन, व्हील चेअर, काठी, वॉकर, तीन चाकी सायकल आवश्यक असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर 9922958683 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संजीवन फाउंडेशन कडुन करण्यात येत आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.श्री. संजय देवगुंडे सर,ग्रामपंचायत सरपंच आप्पासाहेब शेंडगे यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूराव काळे, वसंत बर्वे ,उपसरपंच महावीर शेंडगे, आनंद शेंडगे, सखाराम आबा शेंडगे, विलास पाटील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा