ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना नोटीस देऊन सोडल्या प्रकरणी डि.वाय.एस.पी. राजकुमार केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा...! एन.डी.एम.जे. संघटनेची पोलिस उपमाहानिरीक्षक नांदेड यांच्याकडे मागणी...
हिंगोली:
मौजे बोराळवाडी ता.जि. हिंगोली येथील परसराम कचरू ढाकरे यांच्या फिर्यादीवरून दि. 12/05/2026 रोजी आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा क्र.103/2026 दाखल झाला होता, सदरचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मौजे बोराळवाडी येथील संपूर्ण आदिवासी समाजावर तेथील सवर्ण समाजातील लोकांनी बहिष्कार टाकला होता, बहिष्कारा सारखी गंभीर घटना बोराळवाडी गावात घडल्यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या महसूल व समाजकल्याण प्रशासनाने गावामध्ये शांतता बैठक घेऊन घेऊन सदरचा बहिष्कार उठवला, परंतु बहिष्कराचा गुन्हा तक्रार देऊन देखिल आद्याप पर्यंत दाखल करण्यात आलेला नाही.
ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर गुन्ह्यातील आरोपींनी मा. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून अंतरिम जामीन मागितला होता सदरचा जामीन मा. न्यायालयाने फेटाळला.
मा. न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला असताना व ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये अटकपूर्व जामीन ची तरतूद नसताना देखील उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना नोटीस वर सोडून कर्तव्यात कसूर केलेला असल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 च्या कलम चार प्रमाणे व इतर चालू प्रचलित कायद्याच्या योग्य कलमान्वये गुन्हे नोंद करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतीने मा. पोलीस उप महानिरीक्षक साहेब परिक्षेत्र कार्यालय नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, बंजारा समाजाचे नेते विलास उत्तम राठोड, ओमकार गजानन धारकर, वैभव वैजनाथ दिपके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत, सदर प्रकरणात कार्यवाही न झाल्यास नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ॲड. डॉ. केवल ऊके साहेब, राज्य सचिव वैभवजी गीते साहेब सहसचिव पी. एस. खंदारे साहेब यांच्या नेतृत्वात मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची व सर्व पक्ष संघटनेच्या वतीने महामोर्चा काढणार असल्याची माहिती पत्रकाराशी बोलताना जगदिप वसंतराव दिपके यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत