Breaking News

सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांनी कधीही भेदभाव व जातीभेद केला नाही... ह.भ.प. सुखदेव आदाटे..! सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी पुण्यतिथी साजरी..


 नाझरे प्रतिनिधी 

    श्री श्रीधर दत्तानंद जुनाट मंदिराचे जिर्णोधारक निष्कामी सेवाधिपती बाळ ब्रम्हचारी योगी समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांचे श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे 1955 साली आगमन झाले व त्यांनी मंदिरात कधीही भेदभाव व जातीभेद केला नाही व त्यामुळे आज त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास सर्व जाती धर्माचे भक्तगण उपस्थित आहेत व यापुढेही त्यांच्या आदर्श मार्गाने सर्वांनी वाटचाल केल्यास मानवी जीवनात काहीही कमी पडणार नाही असे ह भ प संजीव दास महाराज यांचे शिष्य हभप सुखदेव आदाटे महाराज यांनी पुष्पवृष्टीच्या कीर्तनात श्री दत्त मंदिर नाझरे वझरे ता. सांगोला येथे कीर्तनात सांगितले. 


 सप्ताहात भजन, किर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन तसेच बाबासो कोकरे, धुळा कोकरे, पांडुरंग कोकरे, विठ्ठल कोकरे, आबा कोकरे, संभाजी कोकरे, दत्तात्रेय सरगर, लक्ष्मण व रामचंद्र आलदर, प्रशांत रेड्डी, सदाशिव मलमे, सुभाष कोकरे, आप्पासो कोळेकर इत्यादी संजीव भक्तांनी पंगत आयोजित केली होती. तसेच महास्वामीच्या पालखीची नाझरे गावातून संजीवा मंडळ यांच्या मनमोहक नाच गाण्यासह, भजनी मंडळे नाझरे, वाटंबरे व अनेक दिंड्या समवेत मिरवणूक काढण्यात आली. 

समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांना मंदिरात भक्ती भावा बरोबर नामस्मरण, भजन, किर्तन करून भक्तीचे द्वार उघडले तसेच स्वच्छता, टापटीपणा यांचे महत्त्व सांगितले व आज मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून सर्व आवार स्वच्छता करणाऱ्या महिला सेवेकरी बायडाबाई सरगर, सावित्रा चव्हाण, सुंदरा शिंदे, छाया घोडके, उषा चव्हाण या स्वच्छतेची सेवा देतात म्हणून त्यांचा साडी, श्रीफळ देऊन सौ. सरिता लोखंडे, मंगल पाटील, जगू बाई भोसले, जया बनसोडे, भंडारे वहिनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तसेच पत्रकार रविराज शेटे यांचाही विनु बुवा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला सेवेकरींच्या चेहऱ्यावर माझे पुण्य फळा आले आज मी श्री दत्त मंदिरात संजीव स्वामी महाराज पाहिले या प्रचितीप्रमाणे आनंद दिसून येत होता. यावेळी हजारो महिला, पुरुष संजीवा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत