Breaking News

अभिनव पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नववीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. काही विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध गीत, कविता आणि भाषणांच्या माध्यमातून गुरुचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मनोगतातून गुरु हे केवळ शिक्षण देणारे नसून जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे असतात, हे वारंवार ऐकायला मिळाले.

संस्थाध्यक्ष मा. शिवाजी लाडे सर यांनी आपल्या भाषणात गुरुंविषयी आदर व्यक्त करत शिक्षकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, "गुरुदक्षिणा ही फक्त वस्तू नसून स्वतःच्या अभ्यासात प्रगती करून उत्तम गुण मिळवणे हाच खरा गुरुंचा सन्मान आहे," असे सांगितले.

मुख्याध्यापिका सौ. कावेरी गिड्डे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर मार्गदर्शन केले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुंच्या पावलावर चालत ज्ञान, संस्कार आणि प्रामाणिकपणाच्या बळावर आपले भविष्य उज्ज्वल करावे, हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत