Breaking News

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर शैक्षणिक संकुल, य. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित
पायोनियर शैक्षणिक संकुल, य. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर शैक्षणिक संकुल, य. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मा. अनिल येलपले सर उपस्थित होते. तसेच पायोनियर  इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर, एच.ओ.डी. रुपनर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पायोनियर शैक्षणिक संकुलच्या सचिव सौ. येलपले मॅडम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सौ. म्हेत्रे मॅडम यांच्या हस्ते सौ. येलपले मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूचे महत्त्व गोष्टीरूपाने व प्रेरणादायी उदाहरणांसह सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी सिमरन येलपले, प्रतीक्षा अलदर, पाहुण्याचे स्वागत नेहा मासाळ , साक्षी पाटील , अनुष्का केंगार , समृद्धी येलपले मंथन बेंद्रे यांनी उत्कृष्टरीत्या केले.
त्यानंतर पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षक व गुरूंबद्दल आदर, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश कसे मिळवावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान संदेश दिला.
यानंतर पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करून जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
शेवटी संस्थापक अध्यक्ष मा. अनिल यलपले सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांचे स्वागत करत गुरूचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, संस्थेची वाटचाल आणि शिक्षणातील मूल्यांची जपणूक याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत गुरूंच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप इयत्ता दहावीची विद्यार्थिनी समृद्धी येलपले हिने आभार प्रदर्शन करून केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत