मंथन परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा अनकढाळ येथे संपन्न..! तालुक्यातील केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक झाले सन्मानित
सांगोला प्रतिनिधी
अहिल्यानगर येथील मंथन वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मंथन स्पर्धा परीक्षा २०२५ चा केंद्रस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वा. राजे शिवाजी करीअर अकॅडमी अनकढाळ (टोल नाका ) येथे मोठ्या उत्साहात पार पला.
हा पारितोषिक वितरण सोहळा मा. सौ. मयुरा खेत्री ( दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी ) यांच्या अध्यक्षतेखाली व मा. नकुसा कोकरे ( सचिव, राजे शिवाजी करीअर अकॅडमी अनकढाळ ) मा. सिद्धेश्वर झाडबुके ( सानेगुरुजी कथामाला सल्लागार ), मा. ज्ञानेश्वर आवटे ( पो. उ. नि. व कृष्णप्रकाश ॲकॅडमी येळवी, यांच्या शुभहस्ते
तर मा.आप्पासाहेब पवार ( केंद्रप्रमुख कमलापूर )मा. रविराज शेटे ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, मा. शिवाजी कोकरे ( केंद्रप्रमुख वाटंबरे ) मा. उमेश चांडवले ( केंद्रप्रमुख उदनवाडी) प्राचार्य आत्माराम काटे, उपप्राचार्या व्हटे मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या वितरण सोहळ्यात नाझरा , पाचेगाव, राजुरी, कोळा, कमलापूर व अजनाळे या परीक्षा केंद्रावरील केंद्रस्तरीय गुणवत्ताधारकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन
सन्मान करण्यात आला.
या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुसो भंडगे यांनी तर आभार प्राचार्य आत्माराम काटे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवदत्त केदार, वसंत गोडसे, महादेव भंडगे, धोकटे सर, सांगोलकर सर श्रेया केदार व राजे शिवाजी करीअर अकॅडमीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
गुणवत्ताधारक
विद्यार्थी, पालक, शिक्षक व सहभागी शाळांचे तालुका स्पर्धा परीक्षा समन्वयक समाधान केदार यांनी आभार व्यक्त करून यापुढेही सहकार्य त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत