चिनके येथे सचिन देशमुख यांचा सत्कार संपन्न..
नाझरे प्रतिनिधी
आज मौजे चिनके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी मुख्यमंत्री शेत रस्ते व पानंद रस्ते तालुका सहअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. सचिनची देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी चिणके गावचे उपसरपंच मोहन मिसाळ यांनी सचिन देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा संदर्भ देत प्रस्तावना केली व आभार प्रदर्शन माजी सरपंच विनायक मिसाळ यांनी केले या सत्कार समारंभ सरपंच नाथा खंडागळे उपसरपंच मोहन मिसाळ ग्रामपंचायत सदस्य विनायक मिसाळ महेश मिसाळ राजेश मिसाळ विजय मिसाळ केशव मिसाळ महादेव माने इंजिनिअर साहेब मुक्तानंद मिसाळ हनुमंत हेगडे विश्वंभर मिसाळ गुरुजी, नाझरे गावचे ग्रामपंचायत सदस्य भारत शेळके तसेच ज्ञानू माऊली व सुधाकर मिसाळ धोंडीराम हेगडे हे उपस्थित होते सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभा नंतर माननीय सचिन देशमुख यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानावर असते या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितली. व चीनके गावाला इथून पुढच्या कालावधीमध्ये रस्ते संदर्भात व इतर कोणते अडचणी संदर्भात सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत