मंगळवेढा शहरात येणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी लावले बॅरिकेड्स व नो एंट्रीचे बोर्ड
मंगळवेढा शहरात येणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी मंगळवेढ्याचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे सो यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोनि दत्तात्रय बोरीगिड्डे सो यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा वाहतूक पोलीस अंमलदार संभाजी यादव व त्यांचे सहकारी पोकॉ सुरज साळुंखे, पोकॉ प्रवीण जाधव यांनी पंढरपूर रोड बायपास चौक व मरवडे रोड बायपास चौक या दोन ठिकाणी बॅरिकेड्स लावून घेतले असून त्यावर नो एंट्रीचे बोर्ड लावण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे व सूचनांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पर्यायी बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून खराब झाला असल्याने जड वाहतूक शहरातून येत आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी वरिष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार करून लवकरात लवकर दुरुस्ती करून घेण्यासाठी पोलीस प्रशासन पाठपुरावा करीत आहे. बायपास रस्ता दुरुस्त होईपर्यंत नागरिकांकडून सहकार्य होणे अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत