क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने प्रा. विजयकुमार लोंढे यांना जाहीर
सांगोला ;मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ व अखंड मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व प्रतिमा शेख यांच्या संयुक्त जयंती उत्सव २०२६ निमित्त देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रा. विजयकुमार लोंढे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. सुरेखा भालेराव यांनी दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत श्रीराम मंगल कार्यालय, पुणे रोड, इसबावी, ता. पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
प्रा. विजयकुमार लोंढे यांनी बहुजन आवाज न्यूज चॅनलचे संपादक, पत्रकार सेवा संघ पश्चिम महाराष्ट्र महासचिव, तसेच पत्रकार सेवा संघ इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदांवर प्रभावीपणे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातून प्रा. लोंढे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत