चोपडी जि.प. गटातील चेतन सिंह केदार व अजय सरगर यांना विजयी करा...- मा. आमदार शहाजी बापू पाटील
नाझरे प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असून, परंपरेने असलेला सांगोला तालुका दुष्काळी तालुक्याचे आपण चित्र बदलले असून, 1995 पासून आज पर्यंत आपण तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहोत व यासाठी पाण्याचा प्रश्न व रस्त्याचा प्रश्न आपण संपविला असून, चोपडी जिल्हा परिषद गटात चेतन सिंह केदार व अजय सरगर हे युवा नेतृत्व असून त्यांना सर्वांनी मतदान देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी के आर वाघमारे यांच्या घरासमोरील कॉर्नर बैठकीत नाझरे ता. सांगोला येथे केले. सुरुवातीस के. आर. वाघमारे गुरुजी व मोहन भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
सांगोला तालुक्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती असून, जे वरती सरकार आहे त्याप्रमाणे सांगोला तालुक्यात ही त्या दृष्टीने कामकाज सुरू आहे म्हणजे सांगोला तालुका आदर्श तालुका म्हणावा लागेल. नाझरे गावास इंग्रजांपासून इतिहास आहे म्हणजे जे कचेरीत रेकॉर्ड सापडत नाही ते नाजऱ्यास बघा असे सांगितले जाते व त्यामुळे येथील तरुण उमेदवार चेतन सिंह केदार व अजय सरगर यांना विकासासाठी मतदान करा असेही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी सांगितले.
सदर प्रसंगी मा. सरपंच भगवान देशमुख, वस्ताद दगडू चौगुले, ग्राम सदस्य जीवन कांबळे, आबासो पाटील, उत्तम बुवा वाघमारे, गुलाब होवाळ, बापू भोसले, राजू भोसले, धर्मा भोसले, युवा नेते राजू खरात, मंगेश रायचुरे, राजकुमार रायचूरे, चेअरमन दगडू बाबर, उत्तम राजे भोसले, लक्ष्मण आलदर, बालाजी वाघमारे, संजय वाघमारे, अरुण वाघमारे, धनाजी कांबळे, अण्णा वाघमारे, धनाजी रणदिवे, गौतम साठे, सागर भोसले, उत्तम वाघमारे, अर्जुन रणदिवे, धनाजी रणदिवे, गणेश ढोबळे, विराज ढोबळे, प्रणव कांबळे, जितेंद्र वाघमारे, आदिनाथ वारे व महिला वर्ग उपस्थित होता. शेवटी सर्वांचे आभार दिलीप सरगर सर यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत