Breaking News

नाझरे येथे संत कवी श्रीधर स्वामी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन....


नाझरे प्रतिनिधी 

     नाझरे ता. सांगोला येथे संत कवी श्रीधर स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जयंत काका देशपांडे यांनी सांगितले. सप्ताहात दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सात ते आठ अभिषेक, नऊ ते बारा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, दुपारी तीन ते पाच भजन, पाच ते सहा हरिपाठ व रात्र आठ ते दहा किर्तन व महाप्रसाद वाटप होईल. तसेच गुरुवार दिनांक 29 जानेवारी ते बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे. 

       गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी ह भ प सचिन पवार वाटंबरे यांचे कीर्तन, व बाबासाहेब भजनी मंडळ बुद्धेहाळ यांचे भजनाचा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी ह भ प डॉक्टर बीरा बंडगर जवळा यांचे कीर्तन व श्रीराम भजनी मंडळ गोडसेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी हभप विष्णू टिळे महाराज माळशिरस यांचे कीर्तन व भारत चव्हाण यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम, रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ह भ प श्री नागेश महाराज यांचे कीर्तन, सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी हभप श्री प्रदीप ढेरे महाराज वेळापूर यांचे कीर्तन व जोगेश्वरी भजनी मंडळ शेटफळे यांचा भजनाचा कार्यक्रम, मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ह भ प श्री वासुदेव टेंभुकर महाराज यांचे कीर्तन व सौ. सरिता यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम, बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा पुण्यतिथी व काल्याचे किर्तन ह भ प श्री नागेश महाराज यांचे होईल व श्री ची फुले पडतील, त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल. तरी श्रीधर भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदीश उर्फ ओंकार देशपांडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत