Breaking News

नाझरे विद्यामंदिर येथे पर्यावरण शिक्षण कार्यक्रम संपन्न..


नाझरे प्रतिनिधी 

       सांगोला तालुक्यात वृक्षाची संख्या कमी असून, प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे असून, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे व यामुळे पर्यावरण संतुलन राखता येते व यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे मत वनक्षेत्रपाल धर्मेंद्र राऊत यांनी नाझरे विद्या मंदिर ता. सांगोला येथे पर्यावरण शिक्षण या कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बीएस माने हे होते. 

     महाराष्ट्र शासन, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर परिक्षेत्र सांगोला यांचे वतीने पर्यावरण शिक्षण शालेय स्तरावर कार्यक्रम विद्या मंदिर मध्ये संपन्न झाला. सुरुवातीस शिक्षक सोमनाथ सपाटे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. 

सदर प्रसंगी सुभाष बुरुंगले वनपाल, प्रवीण क्षीरसागर वनपाल, शंकर भाकरे प्रोग्रॅम मॅनेजर, दत्तात्रय चव्हाण कोऑर्डिनेटर यांनी विद्यार्थ्यांना घरटी बनवण्यापासून ते सर्व आपल्या परिसरातील झाडाचे रक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून माहिती दिली. यावेळी पत्रकार रविराज शेटे, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिक्षक एम एस पाटील यांनी केले तर आभार शिक्षक डीआर सरगर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत