Breaking News

श्री दत्त देवस्थान मोराळे पेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन:गुरुवर्य भालचंद्र पाटील काका

 

सांगोला प्रतिनिधी 

       श्री क्षेत्र दत्त देवस्थान मोराळे पेड येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज व शिवदत्त महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले. 

       एम. एस. आय ब्लड बँक मिरज ही रक्त संचलन करणार आहे असे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज सेवेकरी सूर्यकांत दादा पाटील यांनी सांगितले. तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून सध्या काळाची गरज ओळखून सर्वांनी शिबिरात भाग घ्यावा व समाज हिताचा उपक्रम राबवावा असे आवाहन गुरुवर्य संतोष दादा पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत