जि प प्रा मराठी शाळा जत्तीवस्ती संख शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा ...! शाळेची प्रगती आणि वाटचाल पाहून पालकांचे मन भारावले
सांगोला प्रतिनिधी
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारत माता की जय अशा राष्ट्रहिताच्या घोषणांनी जत्तीवस्ती संख शाळा व परिसर बालचमुंच्या घोषणांनी दुमदुमून गेला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जत्तीवस्ती संख शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी सर्वप्रथम ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण माळी यांचे हस्ते करण्यात आले तदनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर विविध कवायत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. मुलांमध्ये देशभक्ती व कवायतीमधून व्यायामाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी शालेय शिक्षण विभागाने देशभक्तीपर गीतांवर कवायत घेण्याबाबत आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अतिशय सुरेख कवायत शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी करून दाखवली. सदर कवायत नंतर शाळेतील बालगोपाळांनी देशभक्तीपर गीत व भाषण सादर केले. यामध्ये जवळपास सर्वच मुलांचा सहभाग आढळून आला. एकाच वेळी विविध प्रकारामध्ये सर्व मुलांचा सहभाग पाहून पालकांना देखील सुखद धक्का बसला व एकंदरीत होत असलेल्या वाटचालीबाबत व प्रगती बाबत आपल्या शाळे प्रतीच्या भावनाही पालकांच्या डोळ्यांमध्ये उमटलेल्या पाहायला मिळाल्या.
मागील दोन वर्षांपासून शाळेची होत असलेली वाटचाल व पटवाढी साठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे शाळेचे नावलौकिक या आधीच सर्व दूर पोहोचले होते यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातून उपस्थितांचे देखील मन भारावून आले. मागील दोन वर्षापासून शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले प्रणवराज शेटे सर यांनी शाळेची एक नवीन ओळख समाजामध्ये आपल्या कामातून करून दिली आहे तसेच आता शाळेत माळी सरांच्या रूपाने शाळेचे गत वैभव प्राप्त झाले असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण माळी, शिक्षक प्रणवराज शेटे, अंगणवाडी सेविका कांबळे मॅडम, मदतनीस रेखा जाधव, सुरेखा जाधव, पालक सावळा ठोंबरे, मारुती ठोंबरे, राजेश ठोंबरे, अर्जुन गडदे ,भीमाशंकर बागेळी, पोपट व्हटकर, भीमराव व्हटकर, सिद्धराय जत्ती,राहुल पुंदे,मारुती पुंदे, महादेव पुंदे, मल्लू राठोड,रानुबाई पुंदे, राजाक्का पुंदे, श्रद्धा पुंदे, शेवंता पुंदे, साक्षी भंडारे, उमाताई करे, भौरव्वा जत्ती, कोमल ठोंबरे, आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेची प्रगती व वाटचाल पाहून अतिशय आनंद झाला. अशा प्रकारचा सोहळा या शाळेमध्ये आजतागायत न भूतो ना भविष्य असा दिमाखदार सोहळा दोन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला. तसेच माळी सर, व शेटे सरांच्या रूपाने आमच्या मुलांचे भविष्य सुखरूप हातात असल्याबद्दल आम्हालाही खात्री पटली व आम्ही देखील आता निर्धास्त आहोत. दोन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आमच्या मुलांचे भविष्य उज्वल होईल यात कोणतीही शंका नाही.
-श्रद्धा पुंदे (पालक)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत