राज्याचे दादा अजित दादा यांच्या निधना निमित्त नाझरे गाव पूर्णपणे बंद..
नाझरे प्रतिनिधी
कामाची प्रचंड ओळख, प्रशासनावर जबरदस्त पकड, अधिकाऱ्यावर धाक, भल्या पाठी कामाला लागणारा नेता व ज्यांना राज्याचे दादा असे संबोधले जात होते त्यांच्या म्हणजे अजित दादा यांच्या अकाली निधनाने नाजरेगाव शोक काळा पसरली असून, नाझरे गाव पूर्णपणे व्यवहार बंद ठेवून गाव बंद करण्यात आले.
मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे तो कधी कुठे कोणाच्या दाराशी येईल याचा कोणालाही अंदाज नाही, सकाळी हसत खेळत घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी परत येईलच याची हमी नसते. तरीही आपण या सत्याकडे डोळे झाक करून उद्याच्या योजना, अपेक्षा आणि धावपळीत आजचा मौल्यवान क्षण हरवून बसतो व असाच प्रकार अजितदादा यांच्या अकाली निधनाने झाले आहे. सर्वांचे मन सुन्न झाले. अजित दादा यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची बळ लाभो हीच नाजरे ग्रामस्थांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत