सांगोल्याचे उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांचा मोरया अर्बनतर्फे भव्य सत्कार....
सांगोला प्रतिनिधी
सांगोल्या शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वार्ड क्रमांक ११ मधून विजयी झालेले माननीय नितीन इंगोले साहेब यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा सत्कार मोरया अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहन लिगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास मोरया अर्बनचे सचिव धनाजी नष्टे, पत्रकार प्रमोद बनसोडे, घाडगे सर, अवताडे सर तसेच अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराच्या वेळी माननीय नितीन इंगोले साहेब यांना शाल, फेटा व एक वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण करण्यात आला.
यावेळी बोलताना मोहन लिगाडे सर यांनी नितीन इंगोले साहेब यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनतेशी असलेल्या जवळिकीचा उल्लेख केला. उपनगराध्यक्ष म्हणून ते सांगोल्या शहराच्या विकासासाठी भरीव योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नितीन इंगोले साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सांगोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा कार्यक्रम सांगोल्या शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनात एक प्रेरणादायी ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत