Breaking News

नाझरे येथे नवदुर्गा स्वीट होम चे उद्घाटन संपन्न..


      नाझरे प्रतिनिधी    

        नाझरे हे बाजारपेठेचे गाव असून, या गावाला बारा ते पंधरा गावे व वाड्या वस्ती जोडले आहेत व राजस्थान स्वीट होम चे हे तिसरे दुकान असून, मालक चंपालाल यांनी दर्जेदार माल द्यावा व चौकात आदाटे बंधूंनी जागा दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो असे मत मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सुरुवातीस सर्वांचे स्वागत मालक चंपालाल बोस यांनी केले. 

      ग्राहकांची चांगली सोय झाली व स्पर्धेत उतरताना चांगला माल द्या व सेवा चांगली द्या असे शिक्षक नेते दादास वाघमोडे यांनी यावेळी सांगितले. तर स्पर्धेच्या युगात राजस्थान स्वीट, बेकरी उत्पादने प्रसिद्ध असून, यामध्ये त्यांनी वेगळी क्वालिटी करून पदार्थ तयार करणे गरजेचे आहे व ग्राहक ते घेण्यास तयार आहे असे मत शिक्षक नेते अशोक पाटील यांनी यावेळी सांगितले. 

  सदर प्रसंगी अरुण शेठ आदाटे, विनय बोस, सौ. भवरीदेवी बोस, श्रवण रोहिण, दादासो खरात, बाळासोस्वामी, हॉटेल कोयाचे मालक रुबाब शेठ वाघमारे, शिक्षक नेते विजय जावीर, दत्तात्रय गोडसे, सुनील अडसूळ, मल्हारी अडसूळ, पिंटू अडसूळ, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, रामा चोरमुले, दत्तात्रय पाटील, बसवेश्वर पाटील, विनोद स्वामी, संगप्‍पा सरगर, शिंदे टेलर, मंडले, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार पत्रकार रविराज शेटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत