Breaking News

अनकढाळ टोल नाका येथे हॉटेल श्री विठ्ठलचे उद्घाटन संपन्न..! ग्राहक हाच ईश्वर समजून सेवा द्या. ह.भ.प. मच्छिंद्र सरगर


 नाझरे प्रतिनिधी 

      स्व. शिवाजीराव लिंगे यांनी नाझरे मठावर छोटीशी टपरी टाकून हॉटेल व्यवसाय सुरू केला व आज अनेकदा टोल नाका येथे हॉटेल श्री विठ्ठल प्युअर व्हेज या आलिशान हॉटेलचे उद्घाटन होत आहे म्हणजे इवलेसे रोप लावले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी असे म्हणावे लागेल व या कामी सिद्धनाथ लिंगे, त्याची आई व परिवाराचे कष्ट आहे. व ग्राहक हाच ईश्वर समजून सेवा द्या असे मत उद्घाटन प्रसंगी ह भ प मच्छिंद्र सरगर महाराज यांनी व्यक्त केले. सदर हॉटेलचे उद्घाटन आई मालन लिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

     पांडुरंगाच्या मार्गावरती हे हॉटेल असून याची निश्चित भरभराटी होईल परंतु प्रत्येक ग्राहक हा पांडुरंग समजून सिद्धेश्वर लिंगे यांनी सेवा द्यावी असेही सरगर यांनी सांगितले.


 सदर प्रसंगी रवी लवटे महाराज, मालक सिद्धनाथ लिंगे, युवा नेते सुनील बंडगर, योगेश देवकुळे, शहाजी काटे, बापू चौगुले, महादेव चौगुले, अनिल चौगुले, आबा बंडगर, सोहम लिंगे,  अमोल बनकर, दादासाहेब ननवरे, मल्हारी अडसूळ, सुनील अडसूळ, महादेव पाटील मेजर, मा. सरपंच भाग आप्पा बंडगर, राजेश माळी, अजय वाघमारे, सचिन चंदनशिवे, अरुण बनकर, सलीम मुलानी, शब्बीर मुलानी, गणेश शिंदे, मुबारक मुलानी, रियाज मुलानी, बाळासो जगताप, शिव लिंगे, ओंकार बनकर, राणी वाघमारे, संगीता लिंगे, मनीषा बनकर, सुवर्णा बनकर, सीमालिंगे, भाग्यश्री राऊत, सत्यजित राऊत, श्रावणी बनकर, भक्ती बनकर, दिव्यश्री राऊत, राधिका लिंगे व परिवार, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत व आभार सिद्धनाथ लिंगे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत