हातिद ग्रामस्थांच्या वतीने उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांचा जाहीर सत्कार
सांगोला प्रतिनिधी
सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांची निवड झाल्याबद्दल हातिद येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
माननीय श्री. नितीन इंगोले हे सामाजिक, सहकार व विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या सत्कार प्रसंगी मानगंगा परिवार संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चना नितीन इंगोले, हातिद गावच्या सरपंच सौ. संगीता बबन घाडगे, उपसरपंच श्री. संतोष कोळी, माजी सरपंच श्री. बच्चू घाडगे (पापा), तसेच श्री. तानाजी तात्या घाडगे, श्री. गणेश घाडगे, श्री. बबन घाडगे, श्री. अरमान तांबोळी, श्री. कुलदीप घाडगे, श्री. सिद्धू होवळ, श्री. अक्षय होवळ, श्री. दादासाहेब घाडगे, श्री. करीम तांबोळी, श्री. प्रतापराव घाडगे, श्री. जनार्दन मोरे, मानगंगा शाखेचे सर्व कर्मचारी, विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना माननीय श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व सांगोला शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे हातिद ग्रामस्थांचा स्नेह, विश्वास व एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत