शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्यातील कल्पकता ओळखावी.. गणेश शिंदे..! न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पूर्ण.
सांगोला प्रतिनिधी
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्यातील कल्पकता ओळखून त्याला वाव दिला पाहिजे, असे मत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या वार्षिक स्नेहसंमेलन- पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध व्याख्याते श्री गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच येणारा काळ हा आव्हानांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्यामध्ये असणाऱ्या उणीवा ओळखून त्यांचा सकारात्मक उपयोग करून जीवन सफल केले पाहिजे. तसेच शिक्षण घेत असताना फक्त गुण वाढतील म्हणूनच अभ्यास करू नका तर इतिहासातील थोर पुरुषांसोबत तुम्हाला बोलता आलं पाहिजे, विज्ञानातील शास्त्रज्ञांसोबत गप्पा मारता आल्या पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या संकल्पना व्यवस्थित रित्या समजतील, आपल्या कर्तुत्वामुळे आपल्या आई वडीलांना अभिमान वाटला पाहिजे. बदलत्या काळानुसार आपल्याला बदलता आले पाहिजे, हे समजावून देत असताना त्यांनी नोकिया मोबाईल, लाईफ बॉय साबण, एच एम टी घड्याळ अशा वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तुमच्या मध्ये जे गुण आहेत, हे इतरांना दिले पाहिजेत.
माणसे शोभून दिसतात ते त्यांच्या कर्तुत्वाने, हे संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रत्येक प्रयोगामध्ये सर्व जाणून घेऊन त्यांना समर्पक प्रश्न विचारले व सविस्तर मार्गदर्शनही केले, यावरून डॉ. अनिकेत देशमुख यांचे प्रत्येक विषयामध्ये असलेले सखोल ज्ञान समजले. स्व.आबासाहेबांनी शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या दरबारी योग्य प्रकारे आंदोलन करून न्याय मिळवून दिला, यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे सांगितले.
हल्लीच्या नवीन पिढीमध्ये मोबाईल ने आईची जागा घेतली आहे, असे सांगितले. कौशल्या सोबत आपल्या मध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, हे समजावून देत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. परिस्थिती विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना यशस्वी होण्यास रोखू शकत नाही, हे शहनाई वादक बिस्मिल्ला खां यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख हे होते, त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये संस्थेमध्ये ही आम्ही बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आम्हीही शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल करत आहोत, म्हणून पुढील वर्षापासून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( A. I. ) चे कोर्स आमच्या महाविद्यालयामध्ये चालू करणार आहोत, याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, अशा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या संस्थेची स्थापना स्व. आबासाहेबांच्या विचाराने झालेले आहे, इथून पुढेही आम्ही स्व. आबासाहेबांच्या विचारधारेवरतीच या शैक्षणिक संस्थेची वाटचाल सुरू ठेवणार आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आज पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर विद्यार्थ्यांना अल्पप आहाराचे वाटप करण्यात आले, शेवटी सर्वांच्या आवडीचा शेलापागोटे हा कार्यक्रम संपन्न झाला व या शैक्षणिक वर्षातील स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रारंभी स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले व स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी श्रीमती रतनबाई देशमुख, संस्था सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर, प्राचार्य प्रा केशव माने, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, उपमुख्याध्यापिका सौ वैशाली घोडके मॅडम, पर्यवेक्षक श्री तात्यासो इमडे सर, पर्यवेक्षक श्री माणिकराव देशमुख सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख माध्यमिक गट स्मिता इंगोले मॅडम, ज्युनियर गट प्रा सौ इंदिरा येडगे, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा मिलिंद पवार,सांगोला शहरातील प्रतिष्ठित नागरिक,सेवानिवृत्त पदाधिकारी, शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक,पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका सौ. वैशाली घोडके मॅडम, सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.जयश्री केदार-पाटील, सौ कविता शिंदे मॅडम, श्री. अनिल खरात सर , अहवाल वाचन प्राचार्य प्रा. केशव माने, प्रमुख पाहुण्यांची ओळख सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.इंदिरा येडगे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत