Breaking News

अजनाळे जिल्हा परिषद शाळेला सुनील धांडोरे यांचे कडून क्रीडा गणवेशाची भेट – विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद


 अजनाळे प्रतिनिधी

अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम नुकताच पार पडला. सामाजिक जाणिवेतून सुनील धांडोरे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेशाची भेट देण्यात आली. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुढे यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील धांडोरे, उपाध्यक्ष उमेश येलपले, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चंदनशिवे, भारत येलपले, बाळासाहेब देशमुख, शाळेचे शिक्षक आबा गुरव,  ज्योती मोरे - धांडोरे मॅडम, डॉक्टर नवनाथ मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच चित्रपट निर्माता दिग्दर्शक देवदत्त धांडोरे, पत्रकार सचिन धांडोरे, योगेश गुरव, रील्स स्टार राकेश पवार, सोमनाथ खंडागळे, सर्जेराव धांडोरे, सुदर्शन वाघमारे, रोहित बनसोडे, राकेश बनसोडे, प्रवीण येलपले, शुभम कोळवले आदींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

स्पोर्ट गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाल्यास ते नक्कीच उज्वल यश संपादन करतील,” असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम केवळ गणवेश वाटपापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणारा ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत