न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वाढवली रंगत.
सांगोला प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी फन फेअर, फनी गेम्स, रांगोळी प्रदर्शन, विविध गुणदर्शनामध्ये उत्स्फूर्तपणे आपले सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
फन फेअर व फनी गेम्स या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य प्रा केशव माने व उपप्राचार्य प्रा संतोष जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत फनफेअर व फनी गेम्स चा आनंद लुटला. दुपार सत्रामध्ये रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन चौंडेश्वरी महिला मंच सांगोलाच्या उपाध्यक्ष सौ स्नेह कुमठेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी 'बेटी बचाव बेटी पढाओ' , 'प्रदूषण टाळा... पर्यावरण वाचवा..' असे विविध संदेश रांगोळी मधून दिले होते.
दुपार सत्रातील विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य प्रा डॉ. अशोकराव शिंदे, प्रा. दिपकखटकाळे, प्रा.जयंत जानकर, प्राचार्य प्रा केशव माने, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर, उप्राचार्य प्रा संतोष जाधव, उपमुख्याध्यापिका सौ वैशाली घोडके मॅडम, पर्यवेक्षक श्री तात्यासाहेब इमडे,श्री माणिकराव देशमुख सर, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा मिलिंद पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्युनियर गट प्रा. सौ.इंदिरा येडगे, माध्यमिक गट सौ. स्मिता इंगोले मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पाटील केदार, सौ साईश्वरी खडतरे मॅडम, प्रा प्रकाश बाबर, सौ राणी आदलिंगे मॅडम, यांनी तर आभार प्रा दत्तात्रय देशमुख यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत