ग्रामपंचायत अधिकारी विजय कांबळे यांनी अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास
अजनाळे :
सांगोला तालुक्यातील बामणी, चिणके व किडबिसरी या तीन गावांचा ग्रामपंचायत अतिरिक्त कारभार सांभाळणारे ग्रामपंचायत अधिकारी विजय परशराम कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४७ वर्ष होते त्यांच्या आकस्मिक निधनाने ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी,ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
विजय कांबळे हे मूळचे जत येथील रहिवासी होते. सांगोला तालुक्यातील बामणी, चिणके आणि किडबिसरी या तीन गावांचा कार्यभार त्यांच्याकडे होता. ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रशासकीय कामकाजात ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संबंधित गावांतील ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले.
कांबळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विजय कांबळे हे सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांचे बंधू होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता जत येथील सातारा रोडवरील स्मशानभूमीत होणार आहे असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत