सार्वभौमिक मानवाधिकार परिषद संघटनेतर्फे कोळा अस्थी विहार येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
कोळा प्रतिनिधी
भारताचे संविधान शिल्पकार व महान समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, 6 डिसेंबर रोजी सार्वभौमिक मानवाधिकार परिषद संघटनेतर्फे कोळा अस्थी विहार येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावंता सरगर, जिल्हा सचिव अमित मोरे, तालुका अध्यक्ष अभिमान मोरे, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य पदाचे इच्छुक किरण भाऊ पांढरे, तसेच शंकर आलदर, तानाजी सर, कुंडलिक कारंडे, यशवंत गडदे आणि आनंद हातेकर यांनी बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेत विनम्र अभिवादन केले.
महामानवाच्या विचारांना स्मरण करत सर्व पदाधिका-यांनी सामाजिक समता, लोकतांत्रिक मूल्ये आणि मानवाधिकार संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांना अभिवादन करीत त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत