Breaking News

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन...! श्री दत्त जयंती नाझरे.. वझरे येथील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी.


 नाझरे प्रतिनिधी 

    मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र दिनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश अवतार श्री दत्त महाराजांची जयंती संजीव आश्रम नाझरे वजरे येथील मंदिरात बाळ ब्रम्हचारी योगी श्री समर्थ सद्गुरू संजीव स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांनी दत्त दत्त असे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन म्हणत मोठ्या भक्ती भावाने श्रीचे दर्शन घेतले. 

 पहाटे श्री च्या मूर्तीस अभिषेक, आणि गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. तसेच पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, सुमारे चार ते पाच तास दर्शनासाठी रांग लागली होती, यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते. 


      श्री सुखदेव आधाटे महाराज यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तन झाले व दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यानंतर विनु बुवा पाटील यांच्या शुभहस्ते गोपूजन व महाप्रसादाचे पूजन करण्यात आले, तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी चार वाजता श्री च्या पालखीची मिरवणूक नाजरे गावातून काढण्यात आली व भव्य यात्रेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक गुरव, अण्णा चव्हाण व नंदू तोडसे यांच्या जुगलबंदी भारुडाच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रीच्या पालखीचे गावात सर्वत्र स्वागत करण्यात आले व लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत