अनकढाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेकापचे दिगंबर बंडगर यांची निवड..
सांगोला प्रतिनिधी
अनकढाळ ता. सांगोला ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापचे दिगंबर रावसाहेब बंडगर यांची निवड झाली आहे. या अगोदरचे उपसरपंच सौ. मयुरी आदाटे यांनी राजीनामा दिल्याने बंडगर यांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी व विस्तार अधिकारी डी. एस. पुकळे व ग्रामपंचायत अधिकारी संदीप सरगर यांनी काम पाहिले.
सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत