Breaking News

भीमनगर नालंदा बुद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर


मंगळवेढा प्रतिनिधी/ येताळा खरबडे

भारताचे संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगर, मंगळवेढा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुद्ध विहार येथे करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सागर खरबडे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले.

या पूजन सोहळ्याचे पूजन माननीय आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. सोमनाथ अवताडे, मा. अजित जगताप, मा. प्रवीण खवतोडे, मा. इब्राहिम काझी, मा. चंद्रकांत पडवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल 50 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवतेची सेवा बजावली.

या कार्यक्रमात मा. अजित जगताप, मा. बबनराव ढावरे सर, मा. प्रा. बलभीम शिवशरण यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त करून उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीमंत काटे साहेब, जमीर सुतार, प्रदीप खवतोडे, हर्षद डोरले, बबलू सुतार, विक्रम भगरे, विशाल लोकरे, हर्षद खवतोडे, अमोल शेंबडे, सिद्धांत खवतोडे, भैया शिकतोडे, महेश ढावरे, बंटी खरबडे, माजी अध्यक्ष इंद्रजीत तोंडसे, अक्षय होवाळे, आतिश शेंबडे, शुभम वाघमारे, अजित गायकवाड, बापू ढावरे, सनी खरबडे, अमित खरबडे, मानव खरबडे, किरण लोखंडे तसेच अनेक मान्यवर व भीमसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य मैनिनाथ खरबडे यांनी घेतलेल्या बुद्ध वंदनेने झाली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धार्थ लोकरे यांनी करून कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत