Breaking News

दिगंबरा... दिगंबरा... च्या गजरात श्री क्षेत्र मोराळे येथे श्री दत्त जयंती उत्साहात...! एक लाख दत्तभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा घेतला लाभ.


 सांगोला प्रतिनिधी 

      मार्गशीर्ष गुरुवार व दत्त जन्मकाळ सोहळा असा दुर्मिळ योग आल्याने श्री दत्तप्रभू चे द्वितीय अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मोराळे पेड ता. तासगाव येथे दिगंबरा.. दिगंबरा.. च्या गजरात भक्तीचा मळा फुलला होता व सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन योगा बरोबर महाप्रसाद पर्वणीचा लाभ घेतला व श्री दत्त जन्म काळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र व विविध प्रांतातून लाखो भक्तगण उपस्थित होते. 

   अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय व श्री शिवदत्त महाराज की जय या जयघोषाने मोराळे नगरी दुमदुमली असून, सकाळी सहा ते नऊ अभिषेक आरती, सकाळी 9 ते 12 भजन, दुपारी बारा ते साडेबारा नामस्मरण व श्री दत्तप्रभूंची आगमन झाल्यानंतर आरती, पाळणा, ग्रंथ वाचन व भक्ताचे मनोगत संपन्न झाले. व गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 


भाविकांची संख्या जास्त होती व दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या यामध्ये लाखो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच श्री स्वामीभक्त दया भाऊ, मोहिनी मॅडम, ब्रह्मकुमारी दीदी, अविनाश उलवान, सुनील आमले, डॉक्टर श्रद्धा हिंगमिरे, शिक्षिका अनिता कोकणे, सौ. सारिका घोळवे व सुभेदार सुधीर शिंदे इत्यादींनी मोराळ क्षेत्राचा महिमा सांगितला.

  श्रीदत्त गुरूच्या मंदिर कार्यास लवकरच आरंभ होणार असून या क्षेत्री भाव ठेवला तरच प्रचिती येईल व असंख्य व्याधीतून मुक्तता मिळेल परंतु यासाठी सात्विक भक्ती करा व व्यसनापासून दूर राहा व जग वाचण्याचे काम येथे सुरू आहे व यासाठी अन्नदान व मंदिरास सहकार्य करा असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले. 
तसेच येथे सेवेत रुजू व्हा व नामस्मरण करा, सेवेकरांचे काम अत्यंत चांगले असून, होणाऱ्या भव्य दिव्य मंदिरास लाखोच्या हाताने मदत करा असे गुरुवर्य संतोष उर्फ बंडू दादा पाटील यांनी सांगितले. वाहनाचे पार्किंग, महाप्रसाद व्यवस्था, दर्शन रांग याचे नीटनेटके नियोजन सेवेकरांनी केले होते त्यामुळे भाविकात आनंदाचे वातावरण होते. 
यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर, महिला, पुरुष, युवक इत्यादी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत स्वामीभक्त सूर्यकांत दादा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक सचिन गायकवाड व आभार राहुल शिंदे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत