Breaking News

नाझरे येथे राजयोगी निजानंद रंगनाथ स्वामी पुण्यस्मरण व विष्णूयाग सोहळ्याचे आयोजन


नाझरे प्रतिनिधी 

         श्री रंगनाथ श्रीकृष्ण दीक्षित सेलुकर महाराज यांच्या आशीर्वादाने नाझरे ता. सांगोला येथे शुक्रवार दि. 5 डिसेंबर ते रविवार दि. 14 डिसेंबर अखेर राज योगी निजानंद रंगनाथ स्वामी पुण्यस्मरण व विष्णू याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्मारक समितीतर्फे सांगण्यात आले आहे. सप्ताहात पहाटे पाच ते सहा काकड आरती, सकाळी सात ते आठ अभिषेक, सकाळी साडेआठ ते बारा पठण, दुपारी बारा ते अडीच आरती व महाप्रसाद तसेच सायंकाळी सात ते नऊ पंचपदी होईल. 

       दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच रंगनाथ भजनी मंडळाचे भजन, दि. सहा डिसेंबर रोजी यशवंत भजनी मंडळ कडलास यांची भजन सेवा, दि. 7 डिसेंबर रोजी ह भ प रामचंद्र बुवा भिडे यांचे कीर्तन व सौ. सविता ढेरे, होनराज मावळे, सौ. दीपा ढेरे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम, दि. आठ डिसेंबर रोजी बाळू महाराज यांचे कीर्तन, दि. 9 डिसेंबर रोजी वीरभद्र भजनी मंडळ नाझरे यांची भजन सेवा, दि. दहा डिसेंबर रोजी भागवताचार्य वेदांत जोशी जालना यांचे प्रवचन, दि. 11 डिसेंबर रोजी हभप सौ. माधुरीताई पुराणिक तुळजापूर यांचे कीर्तन व संगीतकार निखिल कुलकर्णी लोणंद यांचे गायन, दि. 12 डिसेंबर रोजी ह भ प सौ. वंदनाताई कापरे पुणे यांचे कीर्तन, दि. १३ डिसेंबर रोजी विष्णू याग सोहळा व भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. 

     रविवार दि. 14 डिसेंबर रोजी ह भ प डॉ. ना. पा. देशपांडे यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व पुष्पवृष्टी होईल तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संत कवी श्रीधर स्वामी व रंगनाथ स्वामी स्मारक मंदिरातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत