Breaking News

तहसीलदार बाळूताई भागवत यांचा सार्वभौमिक मानवाधिकार परिषद संघटने कडून सत्कार संपन्न


 सांगोला प्रतिनिधी

मंगळवार, 2 डिसेंबर 2025

सांगोला तालुक्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या स्वागत-सत्काराचा सोहळा सार्वभौमिक मानवाधिकार आयोगाच्या जिल्हा आणि तालुका टीमतर्फे तहसील कार्यालयात उत्साहात पार पडला. कार्यकर्ते, अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कार कार्यक्रमाने तहसील कार्यालयात स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास सार्वभौमिक मानवाधिकार आयोगाचे जिल्हाध्यक्ष श्री. सावंता सरगर, जिल्हा सचिव श्री. अमित मोरे, तालुका अध्यक्ष अभिमान मोरे, तालुका सचिव श्री. दिनेश काटे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. राजवाडे आणि माणदेश महाविद्यालय, जुनोनी येथील प्राध्यापक तानाजी लवटे सर यांचीही उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

तहसीलदार बाळूताई भागवत यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.  तालुक्याच्या प्रशासनाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत