Breaking News

श्री दत्त जयंती निमित्त नाझरे... वझरे येथील मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन..


नाझरे प्रतिनिधी 

      श्रीधर दत्तानंद जुनाट मंदिराचे जिर्णोधारक व निष्काम सेवाधिपती बाळ ब्रम्हचारी योगी श्री समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांचे आज्ञेनुसार श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे दत्त जयंती निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

      शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक 4 डिसेंबर अखेर सकाळी सात ते अकरा गुरुचरित्र पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्र सात ते नऊ कीर्तन, जागर होणार आहे. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. अंबादास करंडे महाराज यांचे कीर्तन व बुद्धेहाळ येथील जागर, शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ह भ प भीमराव अडसूळ महाराज यांचे कीर्तन व अहिल्यानगर येथील जागर, रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी हभप रामहरी खंडागळे महाराज यांचे कीर्तन व कोळे येथील जागर, सोमवार एक डिसेंबर रोजी ह भ प एकनाथ महाराज सांगोलकर यांचे कीर्तन व सांगोलकर वस्ती येथील जागर, मंगळवार दोन डिसेंबर रोजी हभप आप्पा चव्हाण महाराज यांचे कीर्तन व उदन वाडी येथील जागर, बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी ह भ प परमहंस राजयोगी उद्धव महाराज यांचे कीर्तन व इसभावी येथील जागर, गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सद्गुरु संजीव दास महाराज यांचे शिष्य सुखदेव आदाटे महाराज यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत फुलाचे कीर्तन होईल व श्री ची फुले पडतील. त्यानंतर गो पूजन, महाआरती व महाप्रसाद वाटप होईल. तसेच सायंकाळी चार वाजता श्रीच्या पालखीची मिरवणूक नाझरे गावातून निघणार आहे व शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर रोजी चा बाजार दत्त मंदिर कडे होईल तरी याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीव आश्रम नाझरे.. वझरे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत