पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
आज पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये सोलो सिंगिंग स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत Pre-Primary पासून ते सहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता. लहान मुलांचे बोबडे शब्द, त्यांचे निरागस भाव आणि मोठ्या विद्यार्थ्यांची सुरेल सादरीकरणे यामुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले.
स्पर्धा विभाग प्रमुख सौ. प्रातिक्षा येलपले मॅडम यांनी संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले, तर सौ. अश्विनी जाधव मॅडम यांनी आकर्षक सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाळेच्या शिक्षिका सौ. तनुजा ढगे मॅडम आणि सौ. रुपाली गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांची ताल, लय, सुर आणि आत्मविश्वास या निकषांवर मनोयोगाने मूल्यमापन करून परीक्षकांची जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिवा सौ. मनीषा येलपले मॅडम, प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर यांच्या हस्ते झाले असून, या प्रसंगी अकॅडेमिक इनचार्ज मृणाल राऊत मॅडम, ज्योती रणदिवे मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.
अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, मंचावरील भीती दूर होते, संगीताविषयीची जाण विकसित होते आणि आपली कला इतरांसमोर मांडण्याची संधी मिळते. तसेच, अशा विविध स्पर्धांचे आयोजन शाळेमध्ये होत असल्याने मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या टॅलेंटची उजळणी करण्यासाठी उत्तम मंच उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करण्यात आले असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत