सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 24.11.2025 रोजी दुसरे प्रशिक्षण संपन्न
सांगोला प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत एकूण 40 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. सदर मतदान व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी आज दिनांक 24.11.2025 रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी असे एकूण 300 अधिकारी यांना श्री. सैपन नदाफ, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः प्रशिक्षण दिले. तसेच त्यांना EVM मशिन्स हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेल्या व निवडणुकीतून माघार न घेतलेल्या उमेदवारांना दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पू. अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सदर चिन्ह वाटप करतेवेळी उमेदवार व त्यांचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सैपन नदाफ, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. तसेच सर्व उमेदवारांनी आपले दैनंदिन खर्चाचे अहवाल खर्च संनियंत्रण समितीकडे सादर करण्याचे आवाहन, श्री सुधीर गवळी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत