कुमारी यज्ञा दुसाने हत्याप्रकरणी दलित पॅंथर तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर..
सांगोला प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील कुमारी यज्ञा दुसाने या चिमुकलीवर बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याबद्दल आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी दलित पॅंथर तर्फे सांगोला तहसीलदार यांना जिल्हाध्यक्षा जयश्री सावंत यांनी निषेध व्यक्त करून निवेदन सादर केले.
सदरचा खटला विशेष न्यायालयात दाखल करून गुन्हेगार व त्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तीस कडक शिक्षा देण्यात यावी. तसेच चिमुकलीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण व आर्थिक मदत करावी व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर प्रसंगी भास्कर काटे, माधुरी दमाने, प्रणाली कुरणे, रेखा साळवे, मंगल ठोकळे, नंदा वाघमारे, मनीषा कांबळे, लक्ष्मी गेजगे, सोनाली वाघमारे, साधना चव्हाण, सुवर्णा मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत