जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील ९८ सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन विक्री व ग्रॅज्यूटीसाठी २१ कोटी १६ लाख २८हजार ५७० रक्कम वाटप
तालुका प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधीकारी बॅंक खात्यात पेन्शनर शिक्षकाचें निवृत्ती नंतरचे रक्कम जमा केली असल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे
प्रत्येक तालुक्यातील २०२४--२०२५ वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्ती नंतरचे रक्कम देण्यात आली आहे त्यात *अक्कलकोट तालुक्यातील* ९ सेवानिवृत्त शिक्षकांना १७ लाख ७८ हजार ११९४ *बार्शी* १० सेवानिवृत्ताना-२ कोटी ३८ लाख ५८ हजार ७८ *मंगळवेढा* ५ सेवानिवृत्ताना-१ कोटी ३९ लाख १८ हजार ९८९ *माढा* ६ सेवानिवृत्ताना-१ कोटी १० लाख ६७हजार ४९६, *करमाळा* ९ सेवानिवृत्ताना- २ कोटी २३ लाख ३९ हजार ३४२, *पंढरपूर* १३ सेवानिवृत्ताना- ३ कोटी २९ लाख १७ हजार २५४,*सांगोला* ७ सेवानिवृत्ताना-- १कोटी ५८ लाख १० हजार ८९७, *मोहोळ* ६सेवानिवृत्ताना-१ कोटी ३० लाख ६३ हजार ८६, *उ सोलापूर* १० सेवानिवृत्ताना -२ कोटी ५८ लाख ३१ हजार ७१२, *दक्षिण सोलापूर* १२ सेवानिवृत्ताना- २ कोटी ६७ लाख ९५ हजार ८४८, *माळशिरस* ११ सेवानिवृत्ताना-८२ लाख ४४ हजार ६७४ असे *एकूण २१ कोटी १६ लाख २८ हजार ६७४ रक्कम वितरीत केले आहेत*
ऑक्टोबर महिन्यात शिक्षण संचालकांनी राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना ६९० कोटी अनुदान दिले होते त्या पैकी सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना ३९ कोटी अनुदान प्राप्त झाले आहे त्यातून १८ कोटी नियमित पेन्शन वर खर्च करून उर्वरित रक्कम पेन्शन विक्री व ग्रॅज्यूटी साठी वाटप केले आहेत वाटप करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष फुलारी कार्याध्यक्ष काळप्पा सुतार, सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ, पुणे विभागीय अध्यक्ष सिध्देश्वर धसाडे राज्य उपाध्यक्ष रमेश गायकवाड, राजकुमार बिज्जरगी, शंकरराव सांवत वंसतराव दिघे, बादशहा मुल्ला आदींनी सतत पाठपुरावा केले होते
मुख्य कार्यकारी अधीकारी कुलदीप जंगम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख साहेब यांनी तात्काळ सेवानिवृत्ताना निवृत्ती नंतरचे रक्कम अदा केल्याने जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकात समाधान व्यक्त केली जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत