Breaking News

बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन..


नाझरे प्रतिनिधी 

      कै. गुरुवर्य सोपान काका मारुती कारंडे सनगर बुवा यांचे स्मरणार्थ व वै. भीमाशंकर महाराज मंगळवेढेकर यांच्या प्रेरणेने बलवडी ता. सांगोला येथे शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर ते शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ चालक म्हणून नवनीत महाराज करगणी कर हे काम पाहतील. 

     सप्ताहात पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी चार ते पाच प्रवचन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्र नऊ ते 11 हरिकीर्तन व भजन होईल. शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी चार ते पाच ह भ प हनुमंत महाराज राऊत यांचे प्रवचन व रात्री नऊ ते 11 ह भ प हनुमंत महाराज आटपाडी कर यांचे कीर्तन, शनिवार दि. सहा डिसेंबर रोजी ह भ प हनुमंत झुरळे महाराज यांचे प्रवचन व रात्री ह भ प उमेश महाराज यांचे कीर्तन, दि. सात डिसेंबर रोजी ह भ प राजाराम महाराज जवळे यांचे प्रवचन व रात्री ह भ प संजय महाराज भोसले यांचे कीर्तन, दि. आठ डिसेंबर रोजी ह भ प किसन महाराज यांचे प्रवचन व रात्री ह भ प धनंजय महाराज दहिगावकर यांचे कीर्तन, दि. 9 डिसेंबर रोजी ह भ प जगन्नाथ महाराज कदम यांचे प्रवचन व रात्री ह भ प शिवाजी महाराज पहाणे यांचे कीर्तन, दि. दहा डिसेंबर रोजी ह भ प डॉ. पोद्दार यांचे प्रवचन व रात्री ह भ प गुरुवर्य बिबीशन महाराज यांचे कीर्तन, दि. 11 डिसेंबर रोजी हभप प्रा. विजय जाधव यांचे प्रवचन व रात्री ह भ प तुकाराम महाराज उराडे यांचे कीर्तन, शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर रोजी हभप ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांचे सकाळी दहा ते बारा काल्याचे किर्तन होईल तसेच महाप्रसाद वाटप होईल तरी सदर कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बलवडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत