Breaking News

लोकनेते स्व.बसवराज(काका) पाटील विचार मंच संख यांच्याकडून जत्तीवस्ती संख शाळेमध्ये वही वाटप कार्यक्रम संपन्न


 सांगोला प्रतिनिधी 

          जि प प्रा मराठी शाळा जत्तीवस्ती संख शाळेमध्ये दि 15 ऑक्टोंबर रोजी स्व.बसवराज काका पाटील विचार मंच संख यांच्याकडून बाल गोपाळांना वही वाटप करण्यात आले. बसवराज काका पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.  बसवराज पाटील यांनी नेहमीच समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांची विचारधारा कायम जोपासण्याचे काम स्वर्गीय बसवराज काका पाटील विचार मंच संख याच्याकडून आज तागायत अविरतपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देण्यासाठी व विद्यार्थी आपले भवितव्य या वहीच्या पांढऱ्या कागदावर रेखाटनार असून यातून ते नक्कीच उद्याचे यशस्वी नागरिक ठरतील अशा या कार्यक्रमातून नेहमीच विद्यार्थी हित जोपासले जाते असे मत जत्तीवस्ती शाळेचे शिक्षक प्रणवराज शेटे यांनी यावेळी मांडले. 

          सदर कार्यक्रमाचे आयोजन संख चे सरपंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी राहुल फुटाणे सर, आप्पाराय पाटील, आप्पासाहेब जत्ती, राजू मामा बगली, संगण्णा बगली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती,शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण माळी, प्रणवराज शेटे, दत्ता जाधव सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत