सांगोला प्रतिनिधी
भंडारकवठे - दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या जीवन विकास प्रशालेने सर्वांगीण शिक्षण देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात विकासाचा पाया रचला असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य बी.ए.जमादार यांनी केले.तब्बल ४० वर्षांनंतर दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी साहित्यिक प्रा.जमादार यांनी मार्गदर्शन केले.
शाळेची जडणघडण अतिशय संघर्षातून झाल्याचे सांगत प्रा.जमादार म्हणाले,शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी आज्ञेचे पालन केल्यामुळेच आज ते शिखरावर पोहोचले आहेत.आता गोरगरीब मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे,असे आवाहनही त्यांनी केले.प्रत्येकानी आपली नाती जपावीत असेही ते शेवटी म्हणाले.माजी मुख्याध्यापक रामचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सीना - भीमा खोऱ्यात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवावा आणि सकारात्मक जीवन जगावे असे आवाहन केले.
प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी सवाद्य मिरवणुकीने प्रभात फेरी काढून ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.त्यानंतर शिक्षण महर्षी कै.कमळे गुरुजी यांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. १९८६-८७ च्या दहावी वर्गातील सर्व माजी विद्यार्थी गणवेशात शाळेच्या प्रांगणात जमले.निवृत्त गुरूजनांवर पुष्पवृष्टी करून ओवाळणी केली. शाळेची घंटा वाजली,सर्वजण प्रार्थनेला उभारले." सर्वात्मका शिवसुंदरा " ही प्रार्थना झाली राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,परिपाठ, हजेरी सुध्दा घेण्यात आली.श्रीशैल गुजरे आणि रेवप्पा बिराजदार यांनी परिपाठाचे संचलन केले.पी.जी.हडपद यांच्या शालेय चमूसोबत माजी विद्यार्थिनी सौ.त्रिवेणी वठारे,सौ.भारती तावसे, सौ.राजश्री बिराजदार, सौ.सुरेखा सुसलादी यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत व प्रार्थना सादर केली.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पी.एल. कोळी,उपाध्यक्ष डाॅ.चनगोंडा हविनाळे, प्रा.व्ही.के.पाटील,सचिव महादेव कमळे, निवृत्त प्राचार्य जमादार,अरुण पाटील, रामचंद्र कुलकर्णी, सोपान बनसोडे, बसवंत हाडसंगे,सिध्दकुमार पुजारी,सिद्राम बालगांवकर,कलाशिक्षक जी.व्ही.पाटील,तुकाराम पाटील,मल्लिकार्जुन डफळे,सरपंच भीमाशंकर बबलेश्वर,बसवराज मुक्काणे मुख्याध्यापक आमगोंडा मलकारी यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस एलईडी प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.काहींनी विनोदी किस्से सांगितले तर काहींनी त्यावेळी शिक्षकांचा मार खाल्ला म्हणून आज इतक्या उंचीवर पोचल्याचे सांगितले.दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम झाला. व्यक्तिगत परिचय करून देत कौटुंबिक गप्पात सर्वजण रंगून गेले.यावेळी सर्वांनी गुरुजनासोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
● शिक्षकांची पाद्यपूजा अन गौरव..!
भंडारकवठेच्या प्राथमिक शाळेत ५० वर्षापूर्वी पहिलीच्या वर्गात ज्ञानदान केलेल्या निवृत्त शिक्षिका श्रीमती कांताबाई नामदेव कमळे यांची बसवराज बगले आणि राजश्री बिराजदार यांनी पाद्यपूजा करून यथोचित सत्कार केला.
निवृत्त सैनिक रेवणसिद्ध मैंदर्गी यांच्यासह अनेकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रारंभी प्रा.शांतप्पा कुंभार यांनी स्वागत केले.तर प्रस्तावना आणि सूत्रसंचालन डॉ.बसवराज बगले यांनी केले.शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देऊन उपअभियंता सुरेश कमळे यांनी आभार प्रदर्शन केले.वीरभद्र स्वामी यांच्या पसायदानाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली.स्नेह मेळाव्याचे नेटके नियोजन कलाशिक्षक चिदानंद बेनूरे यांनी केले.यशवंत बँकेचे संचालक शावरेप्पा वाघमारे यांनी आकर्षक मंडप उभारणी करून कार्यक्रमाची शान वाढविली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य केशप्पा कन्नूर,शिवानंद हत्ताळे, कांतीलाल बुधाळे,किसन भोई,बसवराज कोरे,सुरेश बिराजदार,अनिल पाटील, भीवा कोकरे,शशिकांत ठाकुर,मादण्णा लावणे,बाळासाहेब कस्तुरे,महासिध्द उमराणी,तानाजी नकाते,सोमनिंग विरदे,अंदानी अथणी,गुरू विरदे,रमेश बनसोडे,मादण्णा पुजारी,सिध्दनिंग कोरे,भीमाशंकर निंबर्गी,आमसिध्द उमराणी,विलास तोरणे,आमसिध्द कमळे,आमसिध्द कुंभार.हणमंत नीळ,बसवंत गुमतापूरे,दत्तात्रय बिराजदार,धर्मण्णा कोळी,संजय संगेदार,गोपाल भस्मे,खाजाभाई जमादार,आप्पासाहेब बाणेगाव,
आमसिध्द कांबळे,मोहन बनपूरे,रमेश बिराजदार,बाळासाहेब गुजरे,शरणप्पा कोळी,राजेंद्र पाटील,महादेव तेलंग,गणपती गुजरे,बिरू कांबळे,मडीवाळप्पा केगाव,ज्ञानदेव डांगे,सुवर्णा स्वामी,प्रमिला कमळे,शारदा मुक्काणे,राजश्री चिंचोळे,निलावती बहिरगोंडे,मल्लमा उटगे,प्रभावती तळे,
महानंदा शेगाव,मंदाकिनी माडग्याळ,विठाबाई दिक्षित,गजराबाई डांगे,आदिंनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत