Breaking News

दत्तात्रय भरणे,हर्षवर्धन पाटील यांच्याकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कार्यकर्ते यांची ओढ . जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे राजकारण लागले तापु .


 विशेष प्रतिनिधी , 

इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी वेग घेत असून, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भाजपा यामध्येच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इंदापूर नगरपालिका या पंचवार्षिक निवडणुकीत  मोठी लढत होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्री म्हणून वर्णी लागल्या नंतर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वजन राज्य पातळीवर वाढलेले आहे.


शेतकऱ्यांना संकटाच्या काळात राज्यभर कृषी मंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी दिलेला आधार व कृषी विभागाच्या माध्यमातून केलेली मदत यामुळे  नेहमी वादात असलेले कृषिमंत्री पद दत्तात्रय भरणे यांनी नैसर्गिक आसमानी संकटात देखील कृषी मंत्रीपदाची गणीमा राखलेली आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये भरणे यांना स्थान मिळाल्याने, इंदापूरशेतकऱ्यांना संकटाच्या काळात राज्यभर कृषी मंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी दिलेला आधार व कृषी विभागाच्या माध्यमातून केलेली मदत यामुळे राज्यात नेहमी वादात असलेले कृषिमंत्री पद दत्तात्रय भरणे यांनी नैसर्गिक आसमानी संकटात देखील कृषी मंत्रीपदाची गणीमा राखलेली आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये भरणे यांना स्थान मिळाल्याने, इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या परिपक्व करण्यासाठी, पक्ष संघटना, कार्यकर्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या लागलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी उतरवले आहेत.


तर इंदापूर विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अपयश येऊन देखील, त्यांनी नीरा-भीमा साखर कारखान्या सारख्या मोठ्या संस्था बिनविरोध करून, आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवली आहे. त्यातच राज्यात साखर कारखानदारी अडचणीत असल्यामुळे, त्याचा फटका देखील इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांना बसला आहे. तरीदेखील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या विचाराचे दोन सहकारी साखर कारखाने, यंदाच्या गाळपासाठी सज्ज केले आहेत.तसेच पाटील यांच्याकडे देखील कार्यकर्ते यांची ओढ वाढताना दिसत आहे.


दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना प्रति टनाला शंभर रुपये देण्याची भूमिका घेतल्याने, ऊस उत्पादक सभासद सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांच्या कारभारावर खूश आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उसाला दर, आरक्षण या विविध विषयावर प्रहार करत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे आपले राजकीय वातावरण निर्माण करतील. असे असले तरी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी लढवलेली विधानसभा, त्यांनी मिळवलेले मतदान व ते सध्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून देखील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजीचा सुरु दिसत आहे. माने यांच्या कार्यपद्धतीवर पूर्णपणे इंदापूर तालुक्यात नवचैतन्य दिसून येत नसल्याने कार्यकर्ते व नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे...


 त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील राजकारण तापू लागले आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे नुकतीच आरक्षण जाहीर होताच तालुक्यामध्ये विविध नेते मंडळी आपली वर्णी लागण्यासाठी काठोकाठ प्रयत्न करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांची देखील कसरत पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात अजून काही माहिती व राजकारण आपल्यापर्यंत कशा पद्धतीने येत आहे याकडे सर्वांचे लक्ष राहील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत