मा. रविराज शेटे सरांचा ‘दैनिक सांगोला नगरी’तर्फे आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष म्हणून सन्मान
सांगोला : सांगोला शहरातील दैनिक सांगोला नगरी या वृत्तपत्राच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. रविराज शेटे सर यांना “आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष” या सन्मानाने गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केलेल्या संघटनात्मक कार्याचा तसेच समाजाभिमुख उपक्रमांचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रविराज शेटे सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने सेवा दिली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यानंतर त्यांनी जाणिवपूर्वक स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. पत्रकार संघटना व वीरशैव संघटना तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच ते वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्यवाह, मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून पत्रकार बांधवांच्या प्रश्नांसाठी, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देत आहेत.
रामकृष्ण व्हिला, सांगोला येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार राजा माने, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, शिवसेना नेते सागर दादा पाटील , भाजपा नेते शिवाजी अण्णा गायकवाड , माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व सेवानीवृत्त प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, आर.पी.आय. अध्यक्ष खंडू सातपुते, दैनिक सांगोला नगरी चे संपादक सतीश सावंत, सीबीएस न्यूज चे संपादक चांद भैय्या शेख वृत्तपत्र संघटना राज्य सदस्य उत्तम चौगुले, संघटना सदस्य जगदीश कुलकर्णी, पवार, गेजगे, जाधव, सौ. संगीता चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान स्वीकारताना रविराज शेटे सर म्हणाले,
हा सन्मान माझा नसून प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याच्या कष्टांचा आणि समाजाशी नाळ जोडून ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचा गौरव आहे. दैनिक सांगोला नगरीने हा सन्मान दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.”


कोणत्याही टिप्पण्या नाहीत