Breaking News

डॉ. धारेश्वर महास्वामींच्या समवेत शिखर शिंगणापूर ते कपिलधार पद यात्रेचे आयोजन..


नाझरे प्रतिनिधी

         संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज समाधी दर्शन घेण्यासाठी गुरुवर्य 108 नीलकंठ शिवाचार्य डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या दिव्य सानिध्यात शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर ते दिनांक 4 नोव्हेंबर अखेर शिखर शिंगणापूर ते कपिलधार पद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे राजकुमार रायचुरे यांनी सांगितले. 

       सदर पद यात्रेसाठी वाहन सेवा गणेश रायचुरे यांनी केले असून, पदयात्रेत संत सहवास, किर्तन, प्रवचनाचा लाभ होणार असून शिवभक्तांनी यात सामील व्हावे असे आवाहन मा. सरपंच रावसाहेब चौगुले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत