Breaking News

राष्ट्रीय एकता दिवस या अभियानांतर्गत वालचंदनगर पोलीस स्टेशनकडुन "राष्ट्रीय एकता दौडचे" आयोजन.


 प्रतिनिधी , संतोष कदम.

वालचंदनगर,

मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० जयंतीचे औचित्त साधुन वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचेवतीने राष्ट्रीय एकता दिवस या अभियानांतर्गत रन फॉर युनिटी (मिनी मॅरेथॉन) चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दौड ०४ किमी चालणे व ०८ किमी धावणे या प्रकारामध्ये घेण्यात आली. सदर दौड ही वालचंदनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हदद्दीमधील क्रिडा संकुल अंथुर्णे येथे आयोजित केल्यानंतर या राष्ट्रीय एकता दौड मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक नागरिक यांच्यासह १९० लोकांनी सहभाग नोंदविला.  दौड पुर्ण झाल्यानंतर सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली.

 एकता दौड ही ०८ किमी प्रकारामध्ये अंथुर्णे ते शेळगांव ब्रीच तसेच ०४ किमी प्रकरामध्ये अंथुर्णे ते मगर पेट्रोलपंप असे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी ०८ किमी धावणे या प्रकरामध्ये प्रथम क्रमांक प्रतिक महेश घोरपडे, व्दितीय क्रमांक संकल्प उत्तम गावडे, तृतीय क्रमांक अर्चित अमोल कडु देशमुख यांनी मिळवला. तसेच ०४ किमी चालणे या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक ॲड. किरण धापटे, व्दितीय क्रमांक अशोक गावडे, तृतीय क्रमांक प्रकाश साळुंखे यांनी मिळवला. त्यानंतर दोन्ही प्रकारामधील प्रथम तीन क्रमांकचे विजेते यांना सन्मान चिन्ह, मेंडल व पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कृष्णदेव क्षिरसागर प्राचार्य भारत चिल्ड्रन स्कुल अकॅडमी वालचंदनगर तसेच ज्येष्ठ नागरिक सुरेश कापडी यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. त्यानंतर राष्ट्रीय एकता दौड मध्ये सहभागी झालेले सर्व नागरिकांसाठी अल्पउपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन हे मा.श्री. संदीपसिंह गिल्ल साो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे साो, अपर पोलीस अधीक्षक बारामती व पुणे विभाग, मा.श्री. डॉ. सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, विजय टेळकीकर पोलीस उपनिरीक्षक, रतिलाल चौधर पोलीस उप-निरीक्षक, गणेश काटकर पोलीस हवालदार २०५३, अभिजीत कळसकर पोलीस अंमलदार ३१२ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत