पेन्शनर संघटनेतर्फे सत्कार संपन्न...
सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनी कार्य केल्याबद्दल व पुरस्कार प्राप्त झाले बद्दल सत्काराचे आयोजन संघटनेच्या सांगोला येथील कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे हे होते. सुरुवातीस सेवानिवृत्त मयत झालेल्या शिक्षकांबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संघटनेचे सल्लागार शंकर सावंत, अध्यक्ष वसंतराव दिघे, संचालिका प्रतिभा शेंडे, संचालक दिनकर घोडके, सचिव अभिमन्यू कांबळे, सहसचिव दत्तात्रय खामकर, प्रसिद्धी प्रमुख रविराज शेटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार शंकर सावंत, दिनकर घोडके, प्रभाकर कसबे, सिद्धेश्वर झाडबुके, प्रतिभा शेंडे, उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे, संचालक बापूसाहेब लवटे, लक्ष्मण सावंत, रविराज शेटे, अभिमन्यू कांबळे इ.नी मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी संघटनेचे खजिनदार गंगाराम इमडे, संचालिका अंबिका शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक एकनाथ शिंदे, शिवाजी काशीद, महादेव चौगुले, दत्तात्रय शिंदे, मच्छिंद्र मिसाळ, शिवाजी राजमाने, दत्तात्रय शास्त्रे, तात्या काबुगडे, जालिंदर केंगार, दिगंबर गायकवाड, अरुण टेळे, बाबासाहेब मोठे इ. उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार अरुण वाघमोडे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत