Breaking News

मेडशिंगी येथे विजेचा शॉक लागून वायरमन चा मृत्यू



मेडशिंगी  – दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास मेडशिंगी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. मेडशिंगी येथील तरुण व कर्तव्यदक्ष वायरमन अक्षय सुखदेव लवटे (शेंडगे ,पठाण वस्ती) हे वीज कनेक्शनचे काम करत असताना अचानक करंट लागून जागीच मृत्युमुखी पडले.

 अक्षय लवटे हे स्वभावाने शांत, मदतीस तत्पर आणि सर्वांच्या गरजेला तत्काळ धावून जाणारे म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने गावातील सर्वच समाजघटकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी मेडशिंगी गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे

अक्षय लवटे यांच्या निधनामुळे मेडशिंगी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत