राजुरी पंचायत समिती गण ताकदीने लढविणार – उत्तम भाऊ पाटील
सांगोला प्रतिनिधी
चोपडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये यंदा सर्वसाधारण पुरुष गणासाठी आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक इच्छुकांसाठी ही एक मोठी राजकीय संधी निर्माण झाली असून या संधीचे सोने करण्याचा निर्धार अनकढाळ येथील मा. सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम भाऊ पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अनकढाळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. आता पंचायत समिती पातळीवर अधिक व्यापक काम करण्याची संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. “आपण आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. जनतेने दिलेली ही संधी विकासाच्या माध्यमातून परतफेड करण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “राजकारणाच्या पलीकडे आपण समाजकारणाला प्राधान्य देत आलो आहोत. नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे प्रश्न सोडविणे हेच आमचे ध्येय राहिले आहे. जनशक्तीच्या आणि मतदारांच्या आशीर्वादावर आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवू.”
उत्तम भाऊ पाटील यांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून प्रत्येक गावात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक चर्चा असून त्यांच्याकडे “विकासाचा चेहरा” म्हणून पाहिले जात आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत विकासाची गती कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजुरी व अनकढाळ परिसरातील जनतेमध्ये त्यांच्या कामाची छाप कायम असून गावोगाव त्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. “जनतेच्या विश्वासावर आणि सहकार्यावर आम्ही पुढे जाणार आहोत,” असे सांगून पाटील यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीची चाहूल दिली आहे.
राजुरी पंचायत समिती गणातील ही निवडणूक यंदा रंगतदार होणार असून उत्तम भाऊ पाटील यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत