शक्तिपीठ महामार्ग मोजणीस सहकार्य करा.. उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी..! मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही..! शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ..!
सांगोला प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्ग मोजणी शेतकऱ्यांनी विरोध करू नये त्यांच्या मागण्या आपण शासन दरबारायापर्यंत पोहोचवू व मोजणीसाठी प्रत्येकाने शेतामध्ये येऊन हद्दी, बोअर, विहीर, ठिबक, पाईपलाईन, दाखविणे गरजेचे आहे म्हणजे नुकसान होणार नाही व यासाठी बाधित शेतकऱ्यांनी संमती दिल्यास चार पट मोबदला अधिक मिळेल व यासाठी विरोधाची भूमिका सोडा व महामार्ग मोजणी सहकार्य करा असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी श्री दत्त मंदिर नागरे वझरे येथे बाधित शेतकऱ्याच्या बैठकीत केले.
सुरुवातीस शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले. तर शक्तिपीठ मोजणी शेतकऱ्यांचा विरोध आहे व यासाठी आपण कोर्टात जाऊ व मुख्यमंत्र्याची शिष्टमंडळ घेऊन भेट घेऊ व त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगू असे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितले. तर शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांना शेअर्स देऊन म्हणजे पार्टनरशिप द्या असे शेतकरी राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहेच व झाल्यास शिवलीलामृत, पांडव प्रताप, हरिविजय, भक्ती विजय या ग्रंथाचे लेखक श्रीधर स्वामी महाराज व संजीव स्वामी महाराज यांचे प्रसिद्ध असलेले येथील श्री दत्त मंदिराचा यात समावेश करा व महामार्गास जोडण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी केले. तर मा. प्राचार्य के. वाय. पाटील, शेतकरी सचिन बनसोडे, तमा पाटील, डॉ. हरिश्चंद्र सोनवणे, मंगेवाडी चे मा. उपसरपंच चंद्रकांत चौगुले, बाळासो शिंदे इत्यादी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधात मत व्यक्त केले.
मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही



कोणत्याही टिप्पण्या नाहीत