वझरे येथे अनुदान यादीत तफावत...! शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर.
सांगोला प्रतिनिधी
वझरे ता. सांगोला येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची घोषणा झाली खरी, व बाधित सर्व शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून अनुदान ही आले परंतु यामध्ये तफावत व घोळ असून कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामे व्यवस्थित केले नाहीत कारण यामध्ये कोणाला भरपाई जास्त तर कोणाला भरपाई कमी व कोणाला काहीच नाही यामुळे असा भेदभाव का केला व त्यामुळे निसर्गनिर्मित हानी आहे का मानवनिर्मित हानी आहे हे शेतकऱ्यांना समजून आले त्यामुळे त्यांनी यादीची फेर तपासणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मंडलाधिकारी, कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.
वझरे येथे प्रशासनाने जी यादी प्रसिद्ध केली या तफावत असून अनेक वास्तविक बाधित शेतकऱ्यांची नावे नाहीत तर क्षेत्र कमी जास्त करून काहीजणास अनुदान भरपूर काढले तर काहींना कमी तर काहींना काहीच नाही असा भेदभाव कशासाठी करायचा तर प्रशासनाने दिलेले अनुदान कमी असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे व यासाठी इतर शेजारील गावाचे अनुदान व वजरे येथील अनुदान यामध्ये मोठी तफावत आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी व न्याय मिळवून द्यावा व यामुळे निसर्गाचा लहरीपणापेक्षा मानवनिर्मित लहरीपणा यातून दिसून येत आहे व यास जबाबदार कृषी सहाय्यक का तलाठी याचे अवलोकन व्हावे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
राजू ज्ञानू पाटील शेतकरी
वझरे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत