शिवमूर्ती लिंगायत ग्रुप विटा तर्फे मिरज येथे मोफत वधू वर परिचय मेळावा संपन्न...
सांगोला प्रतिनिधी
मुलाला व मुलीला चांगले स्थळ मिळावे हे प्रत्येक पालकास वाटते व यासाठी प्रत्येक जण संपत्ती पाहतात व ठरवतात तरी असे न करता मुलगा किंवा मुलगी सुखी कशी राहील हे पहा व मुलाचे मुलीचे गुण व कर्तुत्वपणा पहा तसेच ते मनाने व शरीराने सुदृढ पाहिजेत म्हणजे सुखी जीवन जगतील असे मत शिवदेव स्वामीजी यांनी वधू वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
सुरुवातीस महात्मा बसवेश्वराचे प्रतिमा चे पूजन मान्यवरांच्या हस्ते व महास्वामींच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पाच वधू व पाच वरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. गेली वीस ते बावीस वर्षे झाली अच्युत दुगमे व सौ शांताताई दुगमे हे परिवार मोफत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहे त्यामुळे त्यांचे योगदान फार मोठे आहे असे मत विजयकुमार ठिगळे यांनी व्यक्त केले. मिरज येथील कोळेकर महास्वामींचा मठ वधू-वर परिचयाच्या मेळाव्याने भरगच्च भरला होता. यावेळी शिक्षक नंदकिशोर घोंगडे यांनीही दुगमे परिवाराचे मोफत वधु वर परिचय मेळावा यापूर्वी विटा येथे घेण्यात आला होता तसेच मेळावा कोठेही असला तरी तो मोफत असतो त्यामुळे परिवाराचे कष्ट व सेवा असते असे सांगितले. सदर प्रसंगी डॉक्टर सोमेश्वर पाटील, प्रदीप बापू वाले, रविराज शेटे, सौ. मीनाक्षी मगदूम, सौ रेश्मा जवळे, सौ. अनिता दड्डी, मल्लिकार्जुन पाच्छापुरे, अमोल मल्हारे, शिवकुमार करोशी, विजय कोरे, श्रीकांत महामने, वधू वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र फडके यांनी केले. तर नियोजन व सर्वांचे आभार लिंगायत समाजाचे नेते राजेंद्र मगदूम यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत