नाझरे येथील रंजना देशपांडे यांचे निधन
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील रंजना श्रीधर देशपांडे यांचे शुक्रवार दिनांक 23 मे रोजी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष साठ होते. फोटोग्राफर श्रीधर देशपांडे यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 25 मे रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत