Breaking News

मा. नगराध्यक्ष प्रा. पी.सी. झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त तहसीलदार संतोष कणसे यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव....! नाझरा विद्या मंदिर मध्ये 225 रक्तदात्यांनी केले रक्तदान... !



नाझरे प्रतिनिधी 

     सांगोला नगरीचे मा. नगराध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके सरांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त नाझरे विद्यामंदिर मध्ये 225 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर रक्तदात्यांचे तहसीलदार संतोष कणसे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. 


   
सदर प्रसंगी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, मंडल अधिकारी हरीश जाधव, किरण बाडी वाले, संस्थेचे सचिव म. शं. घोंगडे, सदस्य डी. डी. जगताप, चिनके सरपंच नाथा खंडागळे, उपसरपंच मोहन मिसाळ, मा. सरपंच पिंटू बंडगर, सुनील कांबळे, विनायक मिसाळ, विजय सरगर, जालिंदर मिसाळ, उमेश मिसाळ, ग्राम. सदस्य सुनील अडसूळ, सोसा. व्हाईस चेअरमन राजेंद्र अडसूळ, जीवन कांबळे, सोमनाथ कारंडे, प्राचार्य बिबीशन माने, सांगोला प्राचार्य अमोल गायकवाड, कोळा प्राचार्य श्रीकांत लांडगे, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप, मधुकर धायगुडे, प्रदीप धुकटे, सुरेश मस्तूद, मच्छिंद्र इंगोले, रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर, इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका मंगल पाटील, विनायक पाटील, लायन नरेंद्र होनराव, शंभू झपके, सोमनाथ कारंडे, वरिष्ठ लिपिक हेमंत नलावडे, सचिन पाटणे, प्रशांत रायचुरे, प्रसाद खडतरे, उपसरपंच सुमित्रा लोहार, नाझरे व परिसरातील रक्तदाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार प्राचार्य बिभीषण माने यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत